
कोतोली (प्रतिनिधी) :पांडुरंग फिरींगे
कोतोली मतदारसंघाचा सर्वांगीण आणि शाश्वत विकास साधायचा असेल तर जनसुराज्य शक्ती पक्षाच्या अधिकृत उमेदवार संगीता शंकर पाटील यांना निवडून देणे हाच एकमेव पर्याय असल्याचे ठाम प्रतिपादन विद्यमान आमदार विनय रावजी कोरे यांनी केले. कळे येथे पार पडलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते.
आ. कोरे म्हणाले की, जनसुराज्यकडे सत्ता, निधी आणि विकासाची स्पष्ट दिशा आहे. विरोधक मात्र केवळ पोकळ आश्वासनांच्या जोरावर निवडणूक लढवत आहेत. शंकर पाटील, बाळू पाटील मास्तर, विकास पाटील, दगडू पाटील, विजय बावस्कर, स्वर्गीय नितीन पाटील, दादासो पाटील, अजित खोत, संदीप यादव, संतोष यादव आदींच्या माध्यमातून आमदार निधी व शासनाच्या विविध विकास योजनांचा लाभ कोतोली मतदारसंघाला मिळवून दिला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. काम करण्यासाठी जनतेची ताकद आवश्यक असते आणि ती ताकद संगीता पाटील यांच्या पाठीशी उभी राहील, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य शंकर पाटील म्हणाले की, जोतिबाच्या आशीर्वादाने मला जिल्हा परिषद सदस्य पद मिळाले आणि माझ्या कार्यकाळात गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला.

जनसुराज्य शक्ती पक्षाच्या उमेदवार संगीता पाटील यांनी मनोगतात सांगितले की, आपण शेतकरी कुटुंबातून आले असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न, पाणीटंचाई, रस्ते, आरोग्य व शिक्षणाच्या समस्या जवळून माहिती आहेत. जिल्हा परिषदेवर गेल्यानंतर केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कृतीतून मतदारसंघाचा चेहरा-मोहरा बदलण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
यावेळी पंचायत समितीचे उमेदवार सुनील चौगुले, बाजार भोगावं पंचायत समिती उमेदवार युवराज रंगराव चौगुले,बाळू पाटील मास्तर, विकास पाटील, दगडू पाटील, संदीप यादव, संतोष यादव, दादासो पाटील, सागर वरपे आदींनीही आपली भूमिका मांडली.या जाहीर सभेला बाजीराव पाटील, अजित खोत, युवराज पाटील, बाबासो पाटील, विकास पाटील, बाळू सर, विजय मोरे यांच्यासह जनसुराज्य शक्ती पक्षाचे कार्यकर्ते, महिला वर्ग व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

