मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध – शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

0
63

श्रावण महिना म्हणजे सर्व सणांचा राजा! आपल्या हिंदू संस्कृतीत या महिन्याचे महत्व आपल्याकडे अधिक आहे. त्यामुळे या महिन्यात अनेक धार्मिक तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

मंगळागौर हा त्यातीलच एक भाग. यानिमित्ताने भगिनी एकत्रित येऊन, पारंपरिक पद्धतीने हे व्रत आनंदाने आणि उत्साहाने साजरा करतात. यावेळी खाण्यापिण्याची मोठी रेलचेल असते.

पण आजच्या धकाधकीच्या जीवनात हा उत्सव प्रत्येकालाच साजरा करायला मिळत नाही, त्यामुळे माझ्या कोथरुड मतदारसंघात श्रावण महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

या अंतर्गत कोथरुडमधील माझ्या भगिनींसाठी मंगळागौर आणि पाककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांच्या उपस्थितीत दिमाखात संपन्न झाला.

दरम्यान प्रबोधनपर कार्यक्रमांसाठी नेहमीच सहकार्य करणार असल्याचा मानस याप्रसंगी व्यक्त केला.

यावेळी भाजपा प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, कोथरुड मंडल अध्यक्ष पुनीत जोशी, नगरसेविका मंजुश्री खर्डेकर, ॲड. मिताली सावळेकर, अमृता देवगावकर, उमा गाडगीळ, अनुराधा एडके यांच्या सह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here