कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
वडूज : पुसेसावळी येथे रविवारी (दि. १०) रात्री नऊ ते दहाच्या सुमारास झालेल्या दंगली घटनेत एकजण गंभीर जखमी झाला होता. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला होता.
याप्रकरणी औंंध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
यातील १९ जणांना अटक करून वडूज न्यायालयात हजर केले असता त्यांना प्रारंभी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने रविवार(दि. १७) पर्यंत पोलिस कोठडीची वाढ सुनावली होती.
ती संपल्याने रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावली.
याबाबत माहिती अशी की, पुसेसावळी येथे रविवारी (दि. १०) रात्री उशिरा घडलेल्या दंगलीत पुसेसावळी येथील नुरुलहसन लियाकत शिकलगार ( वय ३० ) यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला होता.
याप्रकरणी प्रकाश भिकू माळी (२१), संग्राम दादासाहेब माळी (२१), पंकज आप्पासाहेब वाठारकर (३४), श्रीकांत नारायण जोशी (२७), विजय ऊर्फ समाधान संजय कर्पे (२७), अमोल पांडुरंग कदम (३८), अभिषेक संजय सोलापुरे (२७), निखिल नंदकुमार घाडगे (२०), गणेश संजय देशमाने (२१, सर्व, रा. पुसेसावळी),
सौरभ सुरेश थोरात (२४), भागवत दिनकर मोहिते (२७), प्रवीण लक्ष्मण भोसले (२७), ओंकार अंकुश थोरात (२३, सर्व, रा. थोरवेवाडी), प्रथमेश अनिल देशमाने (२, रा. पुसेसावळी), विजय बाळासाहेब जाधव (३३), प्रमोद यंशवत सूर्यवंशी (२६), स्वप्निल अंकुश मोहिते (३३), सचिन बाळासाहेब जाधव (३५), रणजित अशोक येवले (३४, सर्व रा. वडी) यांच्या विरोधात औध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.
सर्व १९ जणांना यापूर्वी वडूज येथील न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडी संपल्यानंतर पुन्हा हजर केले असता प्रथम वर्ग १ न्यायदंडाधिकारी गायत्री निमदेव यांनी या संशयितांना न्यायालयीन कोठडी सुनावली.