सावर्डे खुर्द येथील गेली ४० वर्षे शिवसेना गटाचे नेतृत्व करणारे व माजी सरपंच श्री.कृष्णा सखाराम पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला…

0
110

शाहूवाडी प्रतिनिधी : अमर पाटील

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.

यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी सावर्डे खुर्द येथील माजी सरपंच श्री.कृष्णा सखाराम पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला…

यावेळी संतोष कृष्णा पाटील,सतिश कृष्णा पाटील,निलेश आनंदा पाटील,आनंदा महिपती पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here