येलूर पैकी शेळकेवाडी (ता.शाहूवाडी) येथील शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला.

0
115

शाहूवाडी प्रतिनिधी : अमर पाटील

शाहूवाडी-पन्हाळा तालुक्यात आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांना जनतेचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत आहे. गेल्या चार वर्षांमध्ये शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात विकासकामांचा डोंगर उभा केला आहे.

यामुळे गट-तट सोडून शाहूवाडी तालुक्याच्या सर्वांगिण विकासासाठी येलूर पैकी शेळकेवाडी येथील शिवसैनिकांनी आज आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती सर्जेराव दादा पाटील (पेरीडकर) यांच्या उपस्थितीत जनसुराज्य शक्ती पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला…

यावेळी अतुल आनंदा शेळके,योगेश राजाराम बोटांगळे,दिनकर किसन शेळके,दिलीप महिपती शेळके,पांडुरंग आनंदा बोटांगळे,बबन केदार बोटांगळे,धानु मणू शेळके,महादेव मारुती शेळके,वासुदेव शेळके,पोपट खोंगे,सुरेश गणपती शेळके,नथुराम गणपती शेळके,आप्पा रामचंद्र शेळके,वसंत केशव शेळके,मारुती गणपती शेळके,आनंदा गणपती शेळके,मारुती राऊ शेळके,संजय मारूती शेळके,आकाश नारायण शेळके आदी शिवसैनिकांनी जनसुराज्य शक्ती पक्षात जाहीर प्रवेश केला..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here