कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
राज्यातील महावितरण महापारेषण व महानिर्मिती कंपनीतील नियमित रिक्त पदांवर मागील 15 ते 20 वर्षे काम करत असलेल्या वीज कंत्राटी कामगारांना कायम करण्यात यावे अथवा समान काम समान वेतन किंवा कंत्राटदार विरहित रोजंदारी पद्धतीने वयाच्या 60 वर्षा पर्यंत जॉब सिक्युरिटी देण्यात यावी.
या बाबत धोरणात्मक निर्णय घेई पर्यंत या कामगारांना 20,000 रुपये पगारवाढ करावी, त्यांना सुरक्षा साधने,मेडिक्लेम, प्रशिक्षण, गणवेश, रेनकोट, बूट, गणवेश धुलाई भत्ता, मोबाईल व पेट्रोल भत्ता, ओव्हर टाईम,जादा सुट्या मिळाव्या अशा अनेक कामगार हिताच्या व पगार वाढ मागण्यांचा प्रस्ताव वीज कंपनीला महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाच्यां पदाधिकारी यांनी सोमवार दिनांक 20 सप्टेंबर रोजी सादर केला आहे.
मागील कराराच्या वेळेस मुळ वेतनात केवळ 20% ,पगार वाढ मिळाली होती आता 1 एप्रिल 2023 पासून 2028 पर्यत नवा करार होईल, ऊर्जामंत्री व वीज कंपनी प्रशासन यावेळी देखील सहानुभूती पूर्वक या मागण्याचा विचार करेल असा विश्वास संघटनेने व्यक्त केला.