कोल्हापूर – गव्याने केलेल्या हल्ल्यातील जखमीचे निधन, दुचाकीवरून जाताना दिली होती धडक, आजरा तालुक्यात हळहळ

0
100

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापूर : जिल्ह्यातील गडहिंग्लज-आजरा मार्गावर दोन दिवसांपूर्वी हॉटेल बिग बॉससमोर मुंगूसवाडीकडून हाजगोळीच्या दिशेने जाणाऱ्या गवारेड्याने आजऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या मोटरसायकलला जोराची धडक दिली होती.

या धडकेत मोटरसायकलवरील उस्मान कानडीकर (वय 65) हे गंभीर जखमी झाले होते. त्यांचा उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला.रहमान लमतुरे (वय 45 रा. आजरा) जखमी झाले आहेत. दोघांनाही उपचारासाठी गडहिंग्लजमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

यापैकी कानडीकर यांचे उपचारदरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाची बातमी समजतात आजरा शहरात सर्वत्र हळद व्यक्त होत आहे. वन विभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने दोघे जखमी
दरम्यान, उस्मान कानडीकर आणि रहमान लमतुरे हे दोघेही दुचाकीने गडहिंग्लजला गेले होते.

बुधवारी सायंकाळी ते आजऱ्याकडे परतत होते. अण्णा भाऊ आजरा सूतगिरणीजवळ एक गवा अचानक समोर येऊन त्यांच्या मोटारसायकलला धडकला.

त्यामुळे दोघेही मोटारसायकलसह रस्त्यावर पडल्याने ते जखमी झाले. कानडीकर यांना जबर दुखापत झाली होती. त्यांना उपचारासाठी गडहिंग्लज येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. आजरा तालुक्यात गव्याच्या हल्याच्या घटना वाढल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here