पन्हाळा प्रतिनिधी : पन्हाळा विजय शिदें
तालुक्यातील करंजफेण येथील घटना : नणुंद्रे गावावर शोककळा पन्हाळा प्राथमिक आरोग्य केंद्र करंजफेण (ता. शाहूवाडी) अंतर्गत येणाऱ्या नांदगाव आरोग्य उपकेंद्रात नोकरी करत होत्या.
आज सकाळी १० च्या सुमारास प्राथमिक आरोग्य केंद्र, करंजफेण येथे सावर्डी येथील सोनाली सुरेश कांबळे हिच्या प्रसूतीसाठी पुनाळ येथील आरोग्यसेवक हैबती मगदूम यांच्यासोबत जात असताना करंजफेण गावा-जवळच्या धावड्याच्या शेताजवळ करंजफेणहून नांदगाव-कोतोली मार्गे कोल्हापूरला जाणारी एसटी समोरून आल्याने मोटरसायकल बाजूला घेत असताना व रस्ता अरुंद असल्याने साईडपटट्या खचल्याने पुढील चाक घसरले व तोल जाऊन हैबती मगदूम व स्वरुपा शिंदे खाली पडले.
त्याचवेळी एसटी पास होत होती. त्यादरम्यान शिंदे ह्या एसटीच्या मागील चाकाखाली सापडल्या व त्यांच्या डोक्यावरुन चाक गेल्याने त्यांचा जागीच मूत्यू झाला.
दरम्यान, जखमी झालेल्या हैबती मगदूम यांना मलकापूर रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून पन्हाळा तालुक्यातील उत्रे येथील सागर पाटील या एसटी चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
शिंदे यांना इयत्ता ४ मध्ये शिकणारा मुलगा व अंगणवाडीत शिकणारी मुलगी असून त्यांचे पती विजय शिंदे प्राथमिक शिक्षक आहेत.
गौरी गणपतीच्या सणात घडलेल्या अपघाताने नणुंद्रे गावावर शोककळा पसरली आहे.