प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कागल : विविध कारणांमुळे आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय उचलण्याची धक्कादायक मालिका कोल्हापूर जिल्ह्यात सुरुच आहे. आता या मालिकेत जिल्ह्यातील कागल तालुक्यातील तालुक्यातील तरुणाची भर पडली आहे.
अवघ्या तीन महिन्यांपूर्वी लग्नाची झालेल्या तरुणाने पत्नीला माहेरी सोडून राहत्या घरी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूर जिल्ह्यातील कागलमध्ये घडली. रोहित शंकर मोरे (वय २६) असे त्याचे नाव आहे.
रोहितच्या आत्महत्येचं नेमकं कारण समजू शकलेलं नाही. गवंडी काम करणाऱ्या रोहितचे ३ महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्याच्या वडिलांचे वडिलांचे महिन्यापूर्वीच निधन झाले आहे. रोहितची आई त्यांच्या माहेरी गणेशोत्सवासाठी गेली होती.
रोहितने पत्नीला माहेरी सोडले. त्यामुळे घरी रोहित आणि त्याची आजी असे दोघेच होते. सायंकाळी चारच्या सुमारास रोहितने राहत्या घरात दुसऱ्या माळ्यावर खोलीत गळफास लावून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.
यानंतर कागल पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी कागलच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविला.