कागल तालुक्या मध्ये भक्तीमय वातावरणात गणेश विसर्जन, ग्रामस्थांनी निर्माल्य दानाला दिले प्राधान्य

0
193

प्रतिनिधी – अभिनंदन पुरीबुवा

मुरगुड : कागल तालुक्यामध्ये सर्वच गावांमध्ये घरगुती गणेश विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये पार पडले.

सध्या नदी प्रदूषण होऊ नये म्हणुन निर्माल्य नदीमध्ये न टाकण्याचे जिल्हा प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले होते.

या आवाहनाला चांगला प्रतिसाद देत ग्रामपंचायत चिमगांव च्या वतीने निर्माल्य नदीमध्ये न टाकता एकत्रितपणे गोळा करण्यात आले.

निर्माल्य दानाला चांगला प्रतिसाद लाभल्याने सरपंच सरपंच दिपक आंगज ,उपसरपंच आनंदा चौगले सदस्य सागर भोई, सुरेश नाईक, विश्वास करडे, अजिंक्य एकल, लक्ष्मण फराकटे, विश्वास चौगले, मारुती कांबळे, सर्जेराव आवघडे यांनी विशेष आभार मानले.

पारंपारिक वाद्यांच्या गजरात गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात श्री गणेशाचे विसर्जन करण्यात आले.

या वेळी ग्रामपंचायत कर्मचारी धनाजी मांगले, दगडू आवघडे, रणजित मोरबाळे आनंदा कांबळे,अक्षय कांबळे याच्या सह भावेश्वरी मित्र मंडळाचे सदस्य रणजित पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले त्याचबरोबर गणेश विसर्जनावेळी कोणत्याही पद्धतीची आपत्तीजनक घटना घडू नये म्हणुन ग्रामपंचायत प्रशासनाकडून विशेष काळजी घेण्यात आली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here