बाजार भोगाव – परिसरामध्ये मोठ्या भक्तीमय वातावरणात गणेश विसर्जन करण्यात आले

0
125

बाजार भोगावं प्रतिनिधी – सुदर्शन पाटील

बाजार भोगाव ता. पन्हाळा सह परिरसरातील सर्वच गावांमध्ये घरगुती गणेश विसर्जन मोठ्या भक्तिमय वातावरणामध्ये करण्यात आले.

सध्या मोठ्या शहरांमध्ये नदी प्रदूषणाच्या पार्श्वभूमी वरती निर्माल्य नदीमध्ये न टाकण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले होते.

त्या अनुषंगाने ग्रामपंचायत बाजार भोगाव च्या वतीने निर्माल्य नदीमध्ये न टाकता एकत्रितपणे गोळा करण्यात आले.

पारंपारिक ढोल ताशांच्या गजरात फटाक्यांची अतिशबाची व गुलालाची उधळण करीत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या च्या गजरात गणेश भक्तांनी कासारी नदीपात्रामध्ये श्री गणेशाचे विसर्जन केले.

मूर्ती विसर्जना वेळी काही काळ पावसाने हजेरी लावल्यामुळे गणेश भक्तांनी छत्री रेनकोट याचा आधार घेत गणरायाला मोठ्या भक्तिमय वातावरणात निरोप दिला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here