भेडसगाव गणेश विसर्जन मिरवणूक २०२३- उपसरपंच शुभांगी साळुंखे

0
223

शाहूवाडी प्रतिनिधी : अमर पाटील

भेडसगाव /शाहूवाडी : आज भेडसगाव येथील गणेश चतुर्थी पासून सुरु झालेला मांगल्यांच्या उत्सवाचा आज समारोप वाजत-गाजत झाला.ज्या जल्लोषात बाप्पाचे आगमन केले त्याच जल्लोषात ‘पुढच्या वर्षी लवकर या’ ची साद घालत, उत्साही वातारणात लाडक्या गणरायाला आज भेडसगाव येथील नागरिकांनी बाप्पाला निरोप दिला. उद्योगपती आप्पासाहेब साळुंखे यांची सून व भेडसगावच्या उपसरपंच शुभांगी साळुंखे यांनी श्रीचे दर्शन घेतले आणि जाता जाता गणरायांनी आपल्या सगळ्यांचे दुःख, संकट, चिंता, विघ्न दूर करावीत अशी प्रार्थना केली व सर्वांना अनंत चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा भेडसगावच्या उपसरपंच शुभांगी साळुंखे यांनी दिल्या. यावेळी भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here