प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
सातारा : सातारा जिल्ह्यातील पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर कराडच्या हद्दीत जळता मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. सध्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण सुरु असून त्यासाठी मोरी बांधण्याचे काम सुरु आहे.
कराडच्या हद्दीत एका निर्माणाधीन मोरीमध्ये मृतदेह जळत असल्याचे आज सकाळी मॉर्निंग वॉक ला जाणाऱ्या नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली.
खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवून देण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज
पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.
यावेळी दुर्गंधीसह मृतदेह जळत असल्याचे समोर आले. नव्याने बांधण्यात येत असलेल्या मोरीत अर्धवट जळालेल्या अवस्थेत होता. मृतदेहाच्या शेजारी चप्पल असल्याने संबंधित मृतदेह पुरुषाचा असल्याचा कायास आहे.
खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह पेटवण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.