कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उप अभियंता सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे(रा.बेळगाव, हनुमान नगर, भक्तीवेस मंगल कार्यालया जवळ,श्री विठ्ठल पाटील यांचे घरी भाड्याने. (बेळगाव) जि.बेळगाव, मूळ पत्ता.सी वन – 506, साकेत पॅराडाईज, आधारवाडी जेल रोड, कल्याण पश्चिम जि. ठाणे) असं या महिला अधिकाऱ्याचं नाव आहे.
जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले म्हणून बारा लाख रुपयाचे तीन टक्के दराने 33,000/-₹ लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25,000 रुपये लाच स्वीकारताना चंदगड ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या उपअभियंताला लाचलुचपत प्रतिबंधक पथकानं रंगेहात पकडल.
तक्रारदार हे पोट मक्तेदार (ठेकेदार) असुन त्यानी मुळ ठेकेदार यांनी जलजीवन मिशन योजने अंतर्गत घुल्लेवाडी येथील नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरण करण्याचे काम घेतलंय. तक्रारदार यांनी घुल्लेवाडी येथे केलेल्या जलजीवन नळपाणी पुरवठा कामाचे बिल मंजूर केले .
म्हणून तक्रारदार यांचेकडे मंजूर केलेल्या बारा लाख रुपयाचे तीन टक्के दराने 33,000/-₹ लाचेची मागणी करून तडजोडीअंती 25,000 रुपये लाच रक्कम आरोपी यांनी तक्रारदार यांचेकडून स्वतः स्वीकारल्याने त्यांना रंगेहात पकडण्यात आलंय.
आरोपी सुभद्रा लक्ष्मणराव कांबळे यांच्या विरोधात चंदगड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
हा छापा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई संजीव बंबरगेकर,पोहेकॉ विकास माने,सुनील घोसाळकर, पोना सचिन पाटील, मपोकॉ पुनम पाटील ,चापोहेकॉ विष्णु गुरव यांनी ही कारवाई केली.