कोल्हापूर प्रतिनिधी – ( राजेंद्र मकोटे )
-पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी ठेवलेली कोल्हापूरची गणेश विसर्जन मिरवणूक सलग 21 तास चालली तर इराणी खण येथे विसर्जन सलग २४ तासात यशस्वीरित्या पार पडले .आज पहाटे पावणे पाचच्या दरम्यान बापाची चिखली येथे महानगरपालिकेच्या निरोपाच्या बुथवर जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांनी शेवटच्या गणपतीची सामुदायिक आरती केली .
रात्री बारा वाजता न्यायालयाचे निर्णयानुसार सर्व डॉल्बी आणि दोन्ही यंत्रणा बंद झाल्यानंतर सर्व मंडळी शांततेच्या वातावरणात गणेशाचा जयजयकार करत आणि टाळ्या वाजवून आपल्या गणेशाच्या विसर्जन मिरवणुका पूर्ण केल्या .
विसर्जनाच्या मार्गावर कोल्हापूर सराफ व्यापारी असोसिएशन हिंदू एकता आंदोलनविश्व हिंदू परिषद बजरंग दल भारतीय जनता पार्टी मनसे आम आदमी पार्टी माजी आमदार मालोजीराजे विचार मंच रामभाऊ चव्हाण मित्रपरिवार शिवसेना माजी आमदार राजेश शिरसागर मित्रपरिवार जनसुराज्य पार्टी नारीशक्ती फाउंडेशन लोकराज्य पार्टी हिंदू जागरण मंच आदी संस्था संघटनेच्या वतीने निरोपाचे नारळ देण्यात आले .
कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने सर्व गणेश उत्सव मंडळ श्रीफळ आणि पर्यावरण पूरक वर्षाचे वाटप करण्यात आले . महानगरपालिका प्रशासनाच्यावतीने घरगुती व सार्वजनिक मंडळांनी यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक करावा असे आवाहन करण्यात आले ,या उपक्रमाला कोल्हापूरकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सार्वजनिक विसर्जन मिरवणुकी वेळी सार्वजनिक मंडळांनी 160 व घरगुती 963 गणेश मूर्ती या कृत्रिम विसर्जन कुंडाच्या ठिकाणी संकलित करुन इराणी खणीमध्ये पर्यावरण पूरक विसर्जीत करण्यात आल्या. महापालिकेला अर्पण केलेल्या व सार्वजनिक मंडळांनी विसर्जित केलेल्या 1014 मोठ्या गणेश मूर्ती व 1078 लहान गणेश मुर्ती अशा एकूण 2092 गणेश मुर्ती इराणी खण येथे पर्यावरण पूरक विसर्जित करण्यात आल्या.
महापालिकेच्या मुर्तीअर्पण आवाहनास शहरातील अनेक मंडळांनी प्रतिसाद देवून गणेशमुर्ती अर्पण केल्याबद्दल व विसर्जन मिरवणूक शांततेने पार पाडल्याबद्दल महापालिकेच्यावतीने सर्व सार्वजनिक मंडळांच्या अध्यक्ष, प्रतिनिधींचे प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी आभार व्यक्त केले.
हे विसर्जन व्यवस्थित पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी, आरोग्य, सफाई, विद्युत कर्मचारी, वैद्यकीय पथक, व्हाइट आर्मी, महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स, हमाल, क्रेन चालक यांनी विशेष परिश्रम घेतले. या सर्वांनी सलग दोन दिवस अहोरात्र काम केले त्याबद्दल त्यांचेही मनापासून आभार प्रशासकांनी व्यक्त केले.
विक्रमनगर येथील श्रमिक युवा मित्र मंडळाचा शेवटच्या गणपतीची आरती सकाळी 8.15 वाजता प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांच्या हस्ते इराणी खन येथे करण्यात आली.
पापाची टिकटी येथील स्वागत मंडपात 255 गणेश मंडळांची नोंद झाली आहे. तर हॉकी स्टेडियम येथील पर्यायी मिरवणूक मार्गावरील महापालिकेच्या स्वागत मंडपात 305 गणेश मंडळांची नोंद झाली.
महापालिकेकडून विसर्जन ठिकाणी व विर्सजन मार्गावर सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती. विसर्जन मिरवणूक मार्गावरील रस्त्यांची डागडूजी करण्यात आली होती. अतिक्रमण व इतर अडथळे हटविण्यात आले होते.
विसर्जन मार्गावर लाकडी व मजबूत बांबुचे व आवश्यकतेनुसार लोखंडी बॅरिकेटस् व वॉच टॉवर उभे करण्यात आले होते. अग्निशमन विभागामार्फत विसर्जन ठिकाणी अग्निशमन दलाचे दक्षता पथक, सुरक्षा गार्ड असे 50 जवान व महाराष्ट्र रेस्क्यू फोर्स 50 जवान आवश्यक त्या साधनसामुग्रीसह तैनात ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
गणेश मुर्ती विसर्जनासाठी इराणी खण येथे 10 तराफे व 5 क्रेनची व 374 हमालांची व्यवस्था करण्यात आली होती.
यावेळी इराणी खण येथे अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, उप-आयुक्त साधना पाटील, शिल्पा दरेकर, सहा.आयुक्त संजय सरनाईक, डॉ.विजय पाटील, मुख्य व लेखा वित्त अधिकारी सुनिल काटे, मुख्य लेखापरिक्षक मिसाळ शहर अभियंता हर्षजीत घाटगे, उपहशहर अभियंता नारायण भोसले, एन.एस.पाटील, रमेश कांबळे, सतीश फप्पे, उपशहर रचनाकार रमेश मस्कर, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्राबरे, निरिक्षक सुधाकर चल्लावाड, यशपालसिंग रजपूत, चेतन शिंदे, मुख्य अग्निशमन अधिकारी मनीष रणभिसे, मोहन सुर्यवंशी, सर्व अधिकारी विद्युत, पवडी व आरोग्य विभागाचे कर्मचारी, अग्निशमन जवान उपस्थित होते.
कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मिरजकर तिकटी ,बिनखांबी गणेश मंदिर ताराबाई रोडआधी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सायंकाळच्या सुमारास प्रचंड गर्दी झाल्याने विसर्जन्मोनिकीचा मुख्यमार्गातलेल्या बिनकामी गणेश मंदिर ते पापाजी ते या ठिकाणी महिला आणि लहान मुले यांना प्रवेश बंद ठेवण्यात आला.
वादावादीचे दोन चार प्रसंग वगळता पोलिसांनी संयमाने परिस्थिती पार पडली रात्री बारानंतर दोन्ही व्यवस्था बंद झाल्यावर स्वतः जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी मंडळाच्या अध्यक्ष कार्यकर्त्यांशी संपर्क साधून त्यांना गणेश मूर्ती पुणे नेण्यास भाग पाडले .
विसर्जन मिरवणुकीनंतर आता सर्व कार्यकर्त्यांना आपले मंडप – पेंडॉल लवकर काढून घेऊन रस्ते वाहतुकीस खुले करण्याचे आव्हाने पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे .