कोडोली येथे गणेश विसर्जन मिरवणूक रॉकेटचा स्फोट तरुण गंभीर जखमी

0
171

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

पन्हाळा तालुक्यातील कोडोली येथे सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकी वेळी रॉकेट च्या झालेल्या स्फोटामध्ये देवाळे तालुका पन्हाळा येथील भारत चव्हाण हा तरुण गंभीर जखमी झाला आहे ही घटना गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घडली.


याबाबत कोडोली येथील घटनास्थळावरून मिळालेली अधिक माहिती अशी की भारत चौगुले हा आपली सासुरवाडी कोडोली येथे गणेश विसर्जन मिरवणूक पाहण्यासाठी आला होता.

यावेळी भारतच्या एक मित्राच्या मंडळाची मिरवणूक कोडोली येथील शिवाजी चौकामध्ये आली असता लोखंडी पाईप मध्ये लावलेले रॉकेट अजून कसे वाजले नाही म्हणून पाहण्यासाठी भारत चौगुले पुढे गेला असता अचानक रॅकेट भारताच्या उजव्या डोळ्यात घूसन स्फोट झाला यामध्यें भरत चा डोळा कायमस्वरूपी रिकामी झाला असून डोळ्याला मोठी इजा झाली आहे .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here