कोल्हापूर प्रतिनिधी – प्रियांका शिर्के पाटील
कोल्हापूर : चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? असा सवाल करत अनेक मंडळानी कोल्हापुरात सुरू असलेल्या विसर्जन मिरवणुकीत विविध मंडळानी अनेकविध आकर्षक देखावे सादर झाले आहेत.
मानाच्या पहिल्या तुकाराम माळी तालीम मंडळाने आपल्या मिरवणुकीत कोल्हापूरातील समस्यांवर बोट ठेवले आहे तर बजापराव माने तालीम मंडळाने पर्यावरणपूरक संदेश दिला.
मिरवणुकीत मंडळाच्या पुढे असलेल्या मेबॅक कारने कोल्हापूरकरांचे लक्ष वेधून घेतले. कोल्हापूर शहराला भेडसावत असलेल्या सर्व समस्यांवर रोखठोक भाष्य करणारे फलक लावले आहे.
कोल्हापूर शहराला भेडसावणाऱ्या समस्या सुटणार तरी कधी अशी विचारणा यातून करण्यात आली आहे. काय ती हद्दवाढ, काय तीर्थक्षेत्र विकास आराखडा, काय शुद्ध पाणी, सगळं असमाधानी, समदं ओके नाही कोल्हापूर, काय ती वाहतूक कोंडी, चंद्रावर यान गेलं तरी आमच्या कोल्हापुरात चाललंय काय? अशा पद्धतीने फलक या मिरवणुकीत लावून कोल्हापूरच्या समस्यांवर लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
भारतीय स्वातंत्र्याची गाथा
लेटेस्ट ग्रुपने भारतीय स्वातंत्र्याची गाथा मांडली. या मिरवणुकीत देशातील हुतात्मा झालेल्या स्वातंत्र्यवीरांची यादी असलेले फलक, समाजसुधारक, पहिले पुरुष स्वातंत्र्यवीर , महिला स्वातंत्र्यवीर , चिमाजी अप्पा, कित्तुरची राणी चिन्नमा, आझाद हिंद सेना यासोबत मिठाचा सत्याग्रह, दांडी यात्रा, सायमन कमिशनविरुद्ध आंदोलन, भारत छोडो आंदोलन यांचा इतिहास मंडळाच्या कार्यकर्त्यांनी जिवंत केला.