महात्मा गांधी अजरामर व्यक्तिमत्व : डॉ. राजेखान शानेदिवाण कोल्हापूर
त्यांचे विचार तत्वज्ञान आज नव्याने समजून घेण्याची फार गरज आहे. भारतासह जगभर त्यांची आज नव्याने आठवण काढली जात आहे
कारण महात्मा गांधी अजरामर व्यक्तिमत्व आहेत
असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. राजेखान शानेदिवाण यांनी केले.ते राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांच्या जयंती निमित्त… गांधी मरत नसतो या दीर्घ लघु चित्रपटाच्या प्रीमियर शो प्रसंगी बोलत होते.यावेळी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचाराचा जागर करण्यासाठी, महात्मा गांधीजींचे सत्य व परखड विचार तत्त्वज्ञान समजून घेण्यासाठी नवोदित कलाकारांना घेऊन चित्रपट क्षेत्रात नावलौकिक प्राप्त केलेल्या निर्मिती फिल्म क्लब निर्मित शंभरहून अधिक कलाकारांचा समावेश असलेल्या गांधी मरत नसतो या मराठी दीर्घ लघु चित्रपटाच्या पहिला प्रीमिअर शो हाउसफुल झाला.
यावेळी डॉ. नंदकुमार गोंधळी, प्रा. किसनराव कुराडे, प्रा. टी. के. सरगर, भरत लाटकर, डॉ. स्मिता गिरी, अनिल म्हमाने, महेश्वर तेटांबे, छाया पाटील, डॉ. शोभा चाळके, डॉ. शरद शिंदे, लक्ष्मण माळी, दत्तात्रय गायकवाड, भूषण जमदाडे, ॲड. करुणा विमल, तक्ष उराडे, कनिष्का खोबरे, आदित्य म्हमाने, अमिरत्न मिणचेकर, राजवीर जाधव, किशोर खोबरे, सनी गोंधळी यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
सर्वव्यापी छत्रपती शाहू महाराज यांच्या जीवन, कार्य आणि विचारांवर आधारित भव्य निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक लक्ष्मण माळी, द्वितीय क्रमांक प्रा. डॉ. स्मिता गिरी आल्यामुळे विशेष सत्कार करण्यात आला.
यावेळी महात्मा गांधीजी विचार गौरव पुरस्कार देऊन प्रा. किसनराव कुराडे, लक्ष्मण माळी, विनायक पाटील, शंकर पुजारी, काळुराम लांडगे, श्रद्धा बाकरे, अवधूत चेंडके, संतोषी जावीर, नेत्रा मेहता, वासुदेव कांबळे, प्रा. सुभाष कोरे, कृष्णा चव्हाण, उमेश गाड, गणेश कुलकर्णी, उमर फारुख खान, हणमंतू मडीगा यांचा सन्मान करण्यात आला.मंथन जगताप, स्वरल नामे, पृथ्वीराज वायदंडे, साईराज निकम, पृथ्वीराज बाबर, सई शेवाळे, भक्ती व भूमी भस्मे डॉ. निकिता खोबरे, सुधाकर सावंत, वर्षा सामंत, रूपाताई वायदंडे, नूतन गोंधळी, शब्बीर काझी, दिग्विजय कांबळे यांच्यासह गांधीवादी लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वागत व प्रास्ताविक डॉ. स्मिता गिरी, सूत्रसंचालन स्वप्निल गोरंबेकर तर आभार नामदेव मोरे यांनी मानले.