प्रा. पूजा सारोळकर यांनी सर्वांचे स्वागत केले. डॉ. ए.डी. जाधव, सहयोगी प्राध्यापक, सायबर आणि सहाय्यक प्रा. ज्योती आर हिरेमठ, विभागप्रमुख, फॅशन डिझाईन यांच्या शुभहस्ते फोटो पूजन करून कार्यक्रम सुरू करण्यात आला.
सर्व विभागप्रमुख, शिक्षक, प्रशासकीय कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली. स्वच्छ भारत अभियानाची प्रतिज्ञा सहाय्यक प्रा.दिव्या सातपुते, समन्वयक एन.एस.एस. यांनी पठाण केली.
त्यानंतर स्वच्छ भारत सुंदर भारत अभियानासाठी रॅली काढून कार्यक्रम सुरू ठेवण्यात आला.
त्यानंतर गांधी जयंती स्वच्छता दिवस म्हणूनही साजरी करण्यात येते त्याअंतर्गत सर्व प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी यांनी महाविद्यालयाच्या परिसरात स्वच्छता अभियानासाठी योगदान दिले.
कार्यक्रमाची सांगता सहाय्यक प्रा.अर्चना पाटील यांच्या आभार प्रदर्शनाने झाली.
हा कार्यक्रम प्राचार्य डॉ.ए.आर.कुलकर्णी, प्रा.ज्योती आर. हिरेमठ, सहाय्यक. प्रा. श्वेता पाटील, आयक्यूएसी समन्वयक, डॉ. नीलम जिरगे, कर्मचारी सचिव आणि अनुराधा कुंभार समन्वयक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. या कार्यक्रमास सायबर संस्थेचे सेक्रेटरी व मॅनेजिंग ट्रस्टी डॉ. आर.ए. शिंदे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.