कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
या मृत्यूसाठी डॉक्टर, औषधांचा तुटवडा वा खाटांची कमतरता अशी कारणे दिली जात असतील तर ती मान्य नाहीत, अशा शब्दांत फटकारत न्यायालयाने राज्य सरकारकडून तपशिलात माहिती मागितली आहे.
आता, याप्रकरणात नांदेड रुग्णालयाचे डीन डॉ. एस.आर. वाकोडे यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी पुन्हा एकदा सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.
“गरीब जनतेला दर्जेदार आरोग्य सुविधा पुरविणे ही शासनाची जबाबदारी आहे. या जबाबदारीचा सरकारने त्याग केला आहे का? गोरगरिबांच्या जीवाचं सरकारला काहीच मोल वाटत नाही का? असा संतप्त सवाल विचारला आहे.