आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत आरोग्य तपासणी शिबीरास नागरिकांचा मोठा प्रतिसाद

0
116

ता. पन्हाळा येथे शाहुवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉ. विनयरावजी कोरे (सावकर) यांच्या ५२ व्या

वाढदिवसानिमित्त एच. आर. जाधव (आण्णा) चॅरिटेबल ट्रस्ट, बहिरेवाडी‌ आणि डॉ. मिलिंद हिरवे फाउंडेशन,पेठ वडगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन स्त्री-रोग तज्ञ डॉ. बसवराज हंचनाळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी या शिबिरास वारणा उद्योग समूहाच्या संचालिका सौ. श्रुती कोरे यांनी भेट दिली.

या शिबिरास भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

यावेळी वारणा दूध संघाचे उपाध्यक्ष श्री. एच.आर जाधव, कार्यकारी संचालक श्री. मोहन येडुरकर, शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधीक्षक श्री. जयकुमार सूर्यवंशी, जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रवक्ते ॲड. राजेंद्र पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. शितलकुमार डोईजड, लोकनियुक्त सरपंच श्री. शिरीषकुमार जाधव, संचालक के. आर. पाटील, श्री. शिवाजी जंगम, डॉ. प्रताप पाटील, डॉ. मिलिंद हिरवे यांच्यासह तज्ञ डॉक्टर्स, सर्व संस्थांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालक, सभासद तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here