प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
कागल : गोकूळ दूध संघाने गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दोन रुपये कपात केली आहे.
या मुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये संताप निर्माण झाला आहे.या निर्णया विरोधात कागल तालुक्यातील सोनगे येथील दूध उत्पादक शेतकऱ्यानी या दर कपातीचा निषेध व्यक्त केला.
दर कपातीचा निर्णय मागे न घेतल्यास १५ ऑक्टोंबर ला निपाणी -देवगड -मुरगुड हा आंतरराज्य मार्ग रोखणार असल्याचा सोनगे (ता कागल ) येथील दूध उत्पादक शेतकऱ्यांनी दिला.
पशुखाद्यचे वाढणारे भाव चाऱ्याची टंचाई इत्यादीवर होणाऱ्या खर्चामुळे दूधधंदा अडचणीत आला आहे.
दूध संघाने दूध दरात वाढ करण्या ऐवजी दूध दरात कपात करुन दूध उत्पादकाना अर्थिक झटकाच दिला
असल्याच्या प्रतिक्रीया दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यातून उमटवू लागल्या आहेत.