राष्ट्रवादी काकांची कि पुतण्याची ? केंद्रीय निवडणूक आयोगासमोर आज सुनावणी

0
97

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटीमुळे जोरदार वादंग माजले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या वादावर आज भारतीय निडणूक आयोगापुढे सुनावणी होणार आहे.

त्यामुळे राजकीय पक्षांबरोबरच संपुर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. काका पुतणे आता आमने सामने आल्याने पक्षाच्या निर्णयाबाबत आज नेमका काय निर्णय होणार याची उत्सुकता साऱ्याना लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा या मुद्यावर निवडणूक आयोगापुढे आज दुपारी तीन वाजता सुनावणी होणार आहे.

त्यामुळे शरद पवार गटाकडून अभिषेक मनू संघवी बाजू मांडणार आहेत. तर अजित पवार गटाकडून नीरज किशन कौल आणि मनिंदर सिंग यांच्याकडून बाजू मांडली जाणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसमधील हा वाद टोकाला गेला असला तरी आजच्या दिवशी होणारी महत्वाच्या सुनावणीलाच राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्षच गैरहजर राहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

शरद पवार या सुनावणीला गैरहजर राहणार असल्याची शक्यता असल्यामुळे याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.

शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष नेमका कुणाचा यावर गुरुवारी बोलताना सांगितले होते की, राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत आलेल्या 70 प्रस्तावावर माझ्याच उमेदवारी अर्जावर फुटून गेलेल्या उमेदवारांच्या सह्या होत्या, असा खोचक टोला त्यांनी अजित पवार गटाला लगावला होता.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्ष पदासाठी ज्यावेळी निवडणूक झाली होती. त्यावेळी आज फुटलेल्या उमेदवारांपैकी 70 उमेदवारांनी माझ्याच अर्जावर सह्या केल्या होत्या. मात्र आज तिच लोकं राष्ट्रवादी नेमकी कुणाची हा वाद निर्माण करत असल्याचे शरद पवारांनी काल बोलताना सांगितले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here