कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील
पोर्ले तर्फ ठाणे : मिरज येथील महाविद्यालयाची इमारत रंगवताना दुसऱ्या मजल्यावरून तोल जाऊन पडलेल्या पेंटरचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला प्रेमजीत दत्तात्रय मोळे (वय ३० रा.पोर्ले तर्फ ठाणे ता.
पन्हाळा) असे मृत पेंटरचे नाव आहे.ही दुर्दैवी घटना शुक्रवारी सकाळी ८ च्या सुमारास घडली.या घटनेची मिरज शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
घटनास्थळावरून आणि पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, प्रेमजीत मोळे हा गेल्या दहा वर्षापासून पेन्टिंगचे काम करत होता.चार दिवसापूर्वी गावातील मित्रांसोबत मिरजेतील बापूजी साळुंखे महाविद्यालयाची इमारत रंगविण्यासाठी आला होता. शुक्रवारी (दि.६) रोजी सकाळी दुसऱ्या मजल्यावर रंगकाम करीत असताना त्याचा तोल जाऊन जमीनीवर पडल्याने तो गंभीर जखमी झाला.
अपघातानंतर तेथे काम करणाऱ्या प्रशांत वसंत कांबळे यांनी त्याला उपचारासाठी मिरज येथील सिविल रुग्णालयात दाखल केले होते.दुपारी बाराच्या सुमारास उपचार सुरू असताना प्रेमजीतचा मृत्यू झाला. घरची परिस्थिती हालाकी असल्यने प्रेमजीत पेन्टिंगचे काम करून कुटूंबाला मदत करत होता. प्रेमळ आणि मनमिळावू स्वभावाच्या प्रेमजीतच्या अपघाती मृ्त्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात वडील, आई, आजी , भाऊ असा परिवार आहे.