दूधगंगा-वेनगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्रीचे अध्यक्ष श्री. के .पी .पाटील यांनी SP-9 मराठी न्यूज चॅनला सदिच्छा भेट..

0
306

कोल्हापूरचे जेष्ठ मा आम.व श्री. दूधगंगा वेनगंगा सहकारी साखर कारखाना लि. बिद्रीचे अध्यक्ष श्री. के .पी .पाटील यांनी SP-9 मराठी न्यूज चॅनला सदिच्छा भेट..

कोल्हापूरचे जेष्ठ माजी आमदार व श्री दूधगंगा वेनगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री चे अध्यक्ष श्री. के .पी .पाटील यांनी SP-9 मराठी न्यूज चॅनला सदिच्छा भेट देऊन चॅनला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.चॅनलचं ऑफिस बघून व स्टुडिओ सेटअप बघून त्यांनी भरभरून कौतुक केले यावेळी चॅनलच्या वतीने माध्यम समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सागर पाटील यांनी त्यांचा सन्मान शाल ,बुके देऊन स्वागत केले.
सर्वसामान्य जनतेचा विकास म्हणजेच देशाचा खरा विकास हे ब्रीद म्हणून समाजाच्या भल्यासाठी झटणारे आदर्श व्यक्ती महत्त्व म्हणजे माझी आमदार के पी पाटील समाजातील विविध क्षेत्रात संपूर्ण विकास साधला जावा यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. सर्वसामान्याचे प्रश्न समजून घेऊन त्या प्रश्नांना वाचा फोडणारा त्यावर आवश्यक त्या उपाययोजना अमलात आणणारा नेता लोकांना आपला नेताा वाटतो. आपल्या सर्व समावेशक व जनतेशी थेट संपर्क साधण्याच्या वृत्तीमुळे जनसामान्यांचे सशक्त व्यासपीठ अशी त्यांची ओळख निर्माण झाली आहे.सामान्य जनतेच्या प्रश्नाची सोडवणूक हा नेहमीच के पी पाटील यांचा स्थायीभाव राहिला आहे.समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.
राजकीय कार्या बरोबर शैक्षणिक कार्य ही के पी पाटील यांचे जिल्हा बरोबर राज्यभर आदर्श ठरला आहे.सामान्य विद्यार्थ्यांना उत्तम शिक्षण मिळावे व त्याद्वारे त्यांची उत्तम प्रगती व्हावे यासाठी सन 1990 मध्ये मुदाळ येते श्री बाळू मामा शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली व त्या योगे माध्यमिक शिक्षणाचा पाया घातला .यानंतर उच्च माध्यमिक डीएड, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी व पदविका अकॅडमी असे शिक्षणाचे अनेक पर्याय सुरू करत येथील विद्यार्थ्यांना शिक्षणाची कवाडे उघडी करून दिली. मुदाळ चा त्यांनी घडविलेला शिक्षण पॅटर्न आज जिल्हा बरोबर राज्यभर आदर्श ठरला आहे.सहकारी साखर कारखानदारीतला अभ्यासू नेता अशी त्यांची दृढ ओळख घडली आहे.चार तालुक्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या श्री दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना लिमिटेड बिद्री तालुका कागलचे संचालक ते चेअरमन पद व त्यानंतर बिद्रीचे नेतृत्व के पी पाटील यांचा यशस्वी प्रवास आहे.दळणवळण, सिंचन ,आरोग्य ,पाणी ,तीर्थक्षेत्र, ऐतिहासिक स्थळे ,पर्यटन अशा अनेक योजना त्यांनी प्रभावीपणे राबवल्या. समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी व त्यांच्या उन्नतीसाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले.माणुसकीतील माजी आमदार के पी पाटील म्हणून त्यांची ख्याती पूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे.

यावेळी हिट्स बीट्सचे प्रमुख प्रसिद्ध गायक प्रल्हाद पाटील,चॅनलचे जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंगे,सतीश घोरपडे, विनायक देसाई,
आनंदा पाटील, पी जी पाटील ,कपिल मुळे ,सतीश घोरपडे, विजय ढेरे, निलेश मुळे, कॅमेरामॅन मयूर पाटील, श्रेयश भोसले.आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here