अल्पवयीन बहीणीवर बलात्कार झाला, पोलिसांनी उभे केले नाही; सहा वर्षांनी भाऊ वकील बनला, अन्…

0
73

कोल्हापूर : प्रतिनिधी प्रियांका शिर्के पाटील

दनकौर, उत्तर प्रदेश : घटना सहा वर्षांपूर्वीची आहे. एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आला होता. परंतू, उत्तर प्रदेशचे पोलीस एवढे ढिम्म की त्यांनी तिने वारंवार फेऱ्या मारुनही त्यांनी तिची तक्रार घेतली नव्हती, तसेच आरोपीलाही मोकाट सोडले होते.

आता ही पीडित मुलगी २२ वर्षांची आहे आणि तिचा भाऊ वकील बनला आहे. या भावाने पोलिसांनाही आता नाक रगडायला लावले आहे.

आपल्या बहीणीची ही अवस्था पाहून अल्पवयीन असलेल्या भावाने वकील होण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी कारवाई न केल्याने या कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला होता. त्याचा बदला या भावाने वकील होऊन घेतला आहे.

बलात्कार झाला तेव्हा ही तरुणी १७ वर्षांची होती. शेजारीच राहणाऱ्या जीतू नावाच्या नराधमाने तिच्यावर बलात्कार केला होता. तर त्याचा मित्र बंटीने तिचे त्या अवस्थेत फोटो काढले होते. यानंतर विरोध केला किंवा तक्रार केली तर जिवे मारण्याची धमकी देखील दिली होती.

मुलीने या प्रकाराची माहिती तिच्या कुटुंबाला दिली. त्यांनी न्यायासाठी व आरोपींना शिक्षा होण्यासाठी कायद्याचे भक्षक बनलेल्या पोलिसांकडे दाद मागितली. परंतू, पोलिसांनी त्यांना उभेही केले नाही.

पुढील काही महिने ते पोलीस ठाण्याच्या चकरा मारत राहिले. परंतू, पोलिसांनी कारवाई केली नाही. कुटुंब हरले, परंतू भावामध्ये या लोकांना धडा शिकविण्याची भावना तयार झाली.

त्याने वकील बनून या आरोपींना आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या पोलिसांना धडा शिकविण्याचे आणि आपल्या बहीणीला न्याय देण्याची शपथ घेतली. त्याने एलएलबीचे शिक्षण घेतले आणि सहा वर्षांनी आरोपी जीतू आणि त्याचा मित्र बंटीविरोधात कोर्टातच केस दाखल केली आहे. तसेच पोलिसांच्या वागणुकीवरही त्याने कोर्टात तक्रार केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here