हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक कमिटीची गारगोटी बस स्थानकास भेट

0
191

राधानगरी – प्रतिनिधी विजय बकरे

हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान या अभियान स्पर्धेमध्ये गारगोटी बस स्थानकाचा समावेश केला आहे त्यासाठी एस टी महामंडळाने कमिटी स्थापन केली .

आहे त्यामध्ये सांगली एसटी चे विभागीय नियंत्रक सुनील भोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सांगलीचे कामगार अधिकारी प्रवीण पाटील व संके क अधिकारी अनिल पार्ट यांनी गारगोटी गारगोटी बस स्थानक भेट देऊन त्यावेळी बस स्टँड बघून समाधान व्यक्त केले.

त्यानंतर कमिटीने बस स्थानकावरील स्वच्छतागृह स्वच्छ आहे का याची पाहणी करण्यात आली त्यावेळी त्यांना स्वच्छ सुंदर असल्याचे समाधान वाटले

स्वच्छ अभियान कमिटीमध्ये गारगोटी येथील पत्रकार प्रकाश खतकर प्रवासी प्रतिनिधी विनायक साटपे यांचा समावेश होता त्यानंतर गोपनीय अहवाल तयार करून तयार करून हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक कमिटी सांगलीचे प्रवीण पाटील व अनिल पार्टी यांच्याकडे देण्यात आला.


यावेळी गारगोटी एसटी आगार चे आगारव्यवस्थापक परशुराम नकाते यांनी कमिटीचे प्रवीण पाटील अनिल पार्टी यांचा गारगोटी बस स्थानकामध्ये पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला

या कार्यक्रमास गारगोटी एसटीआगार चे आगार व्यवस्थापक परशुराम नकाते बस स्थानकाचे स्थानक प्रमुख पूजा घाटगे आगारातील कार्यशाळा अधीक्षक अनिकेत चौगुलेव कर्मचारी वर्ग हजर होता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here