गाय दूध दरवाढीसाठी ‘मनसे’ च्या कार्यकर्त्यांकडून ‘गोकुळ’ च्या बिद्री-बोरवडे शितकरण कार्यालयाची , तोडफोड करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्यांना मुरगूड पोलिसांनी अटक

0
77

राधानगरी प्रतिनिधी विजय , बकरे

इतर संघांच्या बरोबरीने कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ गोकुळ ने गायीच्या दूध दरात कपात केल्याच्या कारणावरून ‘मनसे’च्या कार्यकर्त्यांनी कागल तालुक्यातील बिद्री-बोरवडे दूध शितकरणात शिरुन पोलीसांच्या उपस्थित कार्यालयाची तोडफोड केली.

या मध्ये ‘गोकुळ’ चे तीन ते चार अधिकारी खिडक्यांच्या काचा उडल्‍याने किरकोळ जखमी झाले. याबाबत मूरगूड पोलिसांकडून गुन्हा नोंद झाला असून, आदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी तात्कळ ताब्यात घेतले.


गाय दूध खरेदी दर कपात केल्याबाबत ‘मनसे’ च्या कार्यकर्त्यांकडून ‘गोकुळ’ च्या बिद्री-बोरवडे शितकरण कार्यालयाची तोडफोड
याबाबत अधिक माहिती अशी की, चार दिवसांपूर्वी संघाने गाय दूध दरवाढ करावी.

असे निवेदन ‘मनसे’ चे जिल्हाध्यक्ष युवराज येडूरे व कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’ प्रशासनाला दिले होते. आज (शनिवार) सकाळी ‘मनसे’ चे कार्यकर्त्यांनी ‘गोकुळ’ च्या बिद्री-बोरवडे शितकरण केंद्राच्या गेटवर आंदोलन करून घोषणाबाजी केली. पोलीसांनी याबाबत चार ते पाच प्रमुख कार्यकर्त्यांना आत बोलावून चर्चेसाठी शितकरण केंद्र प्रमुख विजय कदम यांच्या कार्यालयात चर्चेसाठी बोलावले.


चर्चा सुरु असताना गाय दूध दरवाढ मिळालीच पाहिजे. अशी मागणी करीत कार्यकर्त्यांनी हातात असलेल्या झेंड्याच्या काठ्यांनी तोडफोड करण्यात आली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here