पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड फाटा नजिक चारचाकी आणि ट्रक यांचा भीषण अपघात झाला.

0
157

या अपघातात कोल्हापुर मधील तिघेजण ठार झाले आहेत. यामध्ये एका पोलिसाचा समावेश आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी कि, आज शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास पुणे-बंगळूरु महामार्गावर कराड जवळील पाचवड फाटा येथे चारचाकी गाडी (एमएच ०१ एल ४५५८) कोल्हापुरकडुन मुंबईकडे निघाली होती.

यावेळी चारचाकीनं ट्रकला पाठीमागून जोरात धडक दिली. या धडकेत चारचाकी गाडीचा समोरील भाग ट्रकच्या पाठी मागील भागात घुसला. या भीषण अपघातात चारचाकीतील एक महिला आणि दोन पुरुष असा तिघांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये जुना राजवाडा पोलिस स्टेशन चे हवालदार नितीन पवार यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here