कसबा बावडामध्ये तणाव; दुर्गादौडच्या मार्गावर टिपू सुलतान विषयी अक्षेपार्ह्या विधान

0
134

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा कोल्हापूर

कोल्हापूर : नवरात्रोत्सवाचा दुसरा दिवस असतानाच कोल्हापूरातील कसबा बावडा परिसरात आज १६ ( ऑक्टोबर) सकाळी तणावाचे वातावरण निर्माण झाले.

दुर्गा दौड मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण करण्याच्या हेतूने आक्षेपार्ह वाक्य लिहिल्याने तणाव निर्माण झाला. त्यामुळे कोल्हापूर पोलिसांनी लागलीच हस्तक्षेप करत ते वाक्य पुसून टाकले. कोल्हापूर पोलिसांकडून शांततेचे आवाहन करण्यात आले.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी टिपू सुलतानचा उदात्तीकरण करण्याच्या हेतूने स्टेटस लावण्याने कोल्हापूरमध्ये तणाव निर्माण झाला होता. टिपू सुलतान विषयी मजकुर दिसून आल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here