निपाणीजवळ भरधाव ट्रकची पाच वाहनांना धडक, सुदैवाने जीवितहानी नाही; वाहतूक विस्कळीत

0
78

कोल्हापूर : कर्नाटकातील निपाणी जवळील तवंदी घाटामध्ये भरधाव ट्रकने पाच वाहनांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की यामध्ये पाचही वाहनांच्या दर्शनी भागाचा चक्काचूर झाला आहे. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातामुळे तवंदी घाटातील वाहतूक सुमारे तासभर विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

सध्या या ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाचे सहापदरी करण्याचे काम सुरू आहे. नेमका वळणावरच अपघात झाल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली. ठेकेदार कंपनीच्या कामगारांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले. यानंतर टप्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सुरू करण्यात आली. सकाळची वेळ असल्याने महामार्गावर वाहनाची संख्या मोठी होती. गर्दीतून रुग्णवाहिका पुढे सोडताना कसरत करावी लागली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here