राधानगरी प्रतिनिधी विजय बकरे
राधानगरी येथे महिलांच्या करिता होम मिनिस्टर कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाला परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेत पडळीच्या रेखा पाटील या होम मिनिस्टर च्या मानकरी ठरल्या.
तर व्दित्तीय क्रमांक राजश्री साठे तर तृतीय क्रमांक पुजा राणे यांनी पटकावले. राधानगरी मधील श्री अंबाबाई देवालय येथे रमेश पोवार व श्वेता पोवार यांच्या संकल्पनेतून गेले दोन वर्ष नवरात्र उत्सवानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम घेतले जातात.
या कार्यक्रमाचा शुभारंभ उमेश पोवार यांच्या हस्ते करण्यात आला. या स्पर्धेत अनेक गावातील महिलांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे निवेदक विवेक मिठारी यांनी महिलांकडून वेगवेगळे गमतीशीर खेळ खेळून घेतले.
प्रत्येकी दहा महिलांचा ग्रुप करून त्यामधील विजेत्या महिलांमध्ये अंतिम फेरी घेण्यात आली. तसेच कौलव येथील हास्य सम्राट संभाजी यादव यांचा कार्यक्रम घेण्यात आला या स्पर्धेमध्ये वैयक्तिक ही बक्षीस देण्यात आली.
या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा कार्यक्रमाचे संयोजक रमेश पोवार, श्वेता पोवार, उमेश पोवार, अरुणा पोवार,दिगंबर पाटील, जयदीप अतिग्रे पत्रकार विजय बकरे मिलिंद कांबळे,सुभाष चौगुले राकेश केरकर, यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सागर पोवार,कोंडीबा टिपुगडे, शुभम हुपरीकर,विष्णु इंजर,युवराज सारंग,अमोल कांबळे,, पप्पू अंग्रे यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या