कागल प्रतिनिधी:अभिनंदन पुरीबुवा
कागल : चिमगाव (ता कागल ) येथे दर वर्षी प्रमाणे याही वर्षी शारदीय नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. प्रतिदिन देवीची पालखी व नवरात्रकरी मुख्य भावेश्वरी मंदिरा पासून श्री चिमकाईदेवी मंदिरापर्यंत आरतीसाठी ये-जा करत असतात.
हा पालखी मार्ग व श्री चिमकाईदेवी मंदिर परिसर स्वच्छ करण्यासाठी एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी या उपक्रमाचे आयोजन कला शिक्षक संदिप मुसळे यांनी केले असून त्याच्याकडून
गावातील सर्व सेवाभावी संस्था, तरुण मंडळे, मॉर्निंग वॉक साठी जाणारे तरुण, शेतकरी बांधव, नोकरदार, उद्योजक, बचत गट,महिलावर्ग सर्वांना आवाहन करण्यात येत आहे की
. शुक्रवार दि २० (आक्टोंबर) २०२३ रोजी सकाळी ५.३० वाजता श्री चिमकाईदेवी मंदिर स्थळी हजर राहावे.
सोबत– झाडू, खुरपे, फावडे, कुराडी काहीतरी साहित्य असावे.
चला तर मग एक दिवस माझ्या गावाच्या स्वच्छतेसाठी..