कोल्हापुरात कोहलीचे ‘विराट’ कटआऊट

0
87

कोल्हापूर : स्वर्गीय राणा गायकवाड स्पोर्टसच्यावतीने विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनिमित्त भारताचा माजी कर्णधार व स्टार खेळाडू विराट कोहलीचे १५ फुटी कटआऊट उभे करण्यात आले आहे. याचे उदघाटन ऋतुराज क्षीरसागर यांच्या हस्ते बुधवारी झाले.

कोल्हापूरनगरी फुटबाॅल पंढरी म्हणून सर्वत्र गणली जाते. यात परदेशी खेळाडू मेस्सी, नेमार, रोनाॅल्डो यांची छायाचित्रे व कटआऊट उभी केली जातात.

तर क्रिकेटपटू तेही भारतीय स्टार खेळाडूंचीही उभी करून नवीन प्रथा सुरु करून खेळाला प्रोत्साहन द्यायचे या उद्देशाने या संघासह इतर संघातील खेळाडूंनी हे १५ फुटी कटाआऊट उभे केले आहे.

या कटाआऊट उदघाटनप्रसंगी सचिन थोरात, महेश गुरव, भगवान सरनोबत, शामराव पाटील, संदीप कोठावळे, संदीप पाटील, गिरीश पेडणेकर, शेखर पोतदार, आदी क्रिकेटप्रेमी उपस्थित होते.

वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर

वन डे क्रिकेटमध्ये तिसऱ्या क्रमांकावर सर्वाधिक धावा अन् सर्वाधिक ११३ फिफ्टी+ धावांचा विक्रम आता विराटच्या नावावर नोंदवला गेला आहे. कोहलीने आपल्या एकदिवसीय क्रिकेटमधील शतकांची संख्या ४६ वर पोहोचवली आहे.

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ अव्वल स्थानावर

वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघ १.८२१ नेट रन रेटसह अव्वल स्थानावर आहे, तर न्यूझीलंड १.६०४ नेट रन रेटसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. दक्षिण आफ्रिकेला काल पराभव पत्करावा लागला असला तरी त्यांचा नेट रन रेट १.३८५ असा आहे आणि ते ४ गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत. पाठोपाठ पाकिस्तान ( -०.१३७ ) चौथ्या क्रमांकावर आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here