जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या सह जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्या उपस्थितीत जुना राजवाडा कमानीला बांधण्यात आले ताब्यांच्या कलशाचे तोरण

0
90

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा

कोल्हापुर: हिल रायडर्स यांच्या कडुन मंगळवार २४ (आक्टोंबर) रोजी विजयादशमीच्या शुभ मुहुर्तावर कोल्हापुर शहरातील जुना राजवाडा कमानीस ताब्यांच्या कलशाचे तोरण बांधण्यात आले.

यावेळी वृद्धाश्रमातील आजी आजोबा यांच्या हस्ते पुजन करण्यात आले , यावेळी जिल्हाअधिकारी राहूल रेखावार यांच्या सह जिल्हा पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची प्रमुख उपस्थिती होती.

उपस्थिती असणाऱ्या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलाना रणरागिणी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव सुशांत बनसोडे, गणी आजरेकर,सुप्रिया दळवी,संमती मिरजे,स्नेहल घाटगे,उदय गायकवाड,चंदन मिरजकर, विनोद कंबोज,प्रमोद पाटील, ऋषिकेश केसरकर,जगदिश मोरे,आंनद काळे, व हिल रायडर्स परिवारातील सदस्य उपस्थितीत होते.यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार व पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी उपस्थितीताना विजयादशमीच्या शुभेच्छां दिल्या.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी राहुल रेखावार म्हणाले की हिल रायडर्स यांच्या वतीने सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध संस्था संघटनाचा सन्मान करण्यात येऊन त्यांना प्रोत्साहन दिले जाते हि बाब दखल घेण्यासारखी आहे.

सामाजिक कार्यात आपल्या हातुन असेच होत राहो अशा सदिच्छा यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिल्या या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन राहूल बनसोडे यांनी यावेळी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here