सडोली खा येथील महिला शिबिरात संपन्न झाला नवदुर्गांचा सन्मान योग आणि एस.पी.9 मराठी चे डायरेक्टर सागर पाटील यांचे दृढ संबंध : संपादक डॉ.सुरेश राठोड म्हणाले

0
141

सडोली खा(ता.करवीर) येथे कणेरी मठ व संत गोरा कुंभार यांचे संयुक विध्यमाने सलग नवव्या वर्षी महिला योगशिबिर सुरू आहे. शिबिराचा कालावधी 19 ऑक्टोबर ते 29 ऑक्टोबर पहाटे 5 ते 6.30 असा आहे.

शिबिरार्थीना योगगुरू दत्तात्रय पाटील हे मार्गदर्शन करतात. संयोजन म.गांधी व्यसनमुक्ती पुरस्कार प्राप्त अध्यापक एकनाथ कुंभार यांनी केले आहे.
शिबिरात योगासने, प्राणायाम, आहारविहार याविषयावर मार्गदर्शन केले जाते. याशिबिरात निसर्ग भ्रमंती सहल पण असते.


आज शिबिराच्या पाचव्या दिवशी आंतरराष्ट्रीय योगसद्गुरू डॉ कृष्णदेव गिरी व एस.पी.9 मराठी न्यूज चॅनलचे संपादक डॉ.सुरेश राठोड यांनी सदिच्छा भेट दिली. यावेळी डॉक्टर राठोड म्हणाले,एस.पी.9 मराठी न्यूज चॅनलचे डायरेक्टर सागर पाटील व योग यांच्यामध्ये खूप दृढ संबंध आहेत.

देश सेवेत असताना पाटील हे स्वतःबरोबर आपल्या सोबत असणाऱ्या सहकाऱ्यांचेही योगासनाने सुरुवात करत होते. आणि आत्ता सेवानिवृत्तीनंतर न्यूज चॅनेल च्या माध्यमातून योगाचे महत्व पटवून देण्याचे मोठे कार्य ते करत आहे.


यानंतर डॉ.कृष्णदेव गिरी यांनी विठ्ठल उच्चार व टाळी, अनेक रोगांतून मुक्त करते हे प्रात्यक्षिक द्वारे पटवून दिले.
घरातील मुलामुलींनी अगर स्वतः प्राविण्य मिळविलेल्या योगसाधक महिलांचा सत्कार सावित्री उद्योग समूह हसुर दु. च्या विश्वस्त सावित्री बळवंत कुंभार व प्रमुख पाहुण्यांचे हस्ते करण्यात आला.


पाहुण्यांचा परिचय प्रा.पवनकुमार पाटील यांनी करून दिला. स्वागत सुरेश कुंभार यांनी तर आभार कुमारी अक्षता चव्हाण यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here