निर्भया रास गरबा दांडिया स्पर्धा 2023 मोठ्या दिमागात संपन्न महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद…

0
109

SP-9 मराठी एंटरटेनमेंट न्यूज चॅनल व SP-9 मीडिया निर्भय्या वूमन असोसिएशन आयोजित निर्भया रास गरबा दांडिया स्पर्धामोठ्या दिमाखात संपन्न झाल्या.

.या निर्भया रास गरबा दांडिया साठी महिलांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला.या स्पर्धेमध्ये लहान मुलांनी पण भाग घेऊन आनंद द्विगुणित केला..कॉलेज युवती, महिलांनी मोठा सहभाग नोंदवला.

या कार्यक्रमाचे नियोजन शिस्तबद्ध होते.हा कार्यक्रम झंकार बिट्स सुतार बंधू यांच्या ध्वनी स्वरात महिलांनी नृत्याचा ठेका धरला होता.त्याचबरोबर प्रसिद्ध गायक विशाल सुतार आणि त्यांची टीम यांनी उत्कृष्ट ध्वनीस्वर देऊन मंत्रमुक्त केले.


लाईव्ह बँड चे आयोजन सूत्रबद्ध आणि शिस्तबद्ध होते.या स्पर्धेवेळी महिलांनी उत्स्फूर्त असा नृत्याचा आस्वाद घेतला.यावेळी महिलांना वेगवेगळी गिफ्ट देण्यात आली.यामध्ये स्पॉट गेम , रास दांडिया गरबा क्वीन , बेस्ट ड्रेस , बेस्ट डान्स या परफॉर्मन्ससाठी गिफ्ट देण्यात आले.

यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते विजेतांना गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला.

या स्पर्धेमध्ये लहान मुलांच्या मध्ये विनर ठरली आहे श्रेयांशी विजय चौगुले, निकिता ढाले फर्स्ट Runner up, त्याचबरोबर श्रेया वडगावे सेकंड रनर ऑफ म्हणून मान पटकावला.

त्याचबरोबर लहान मुलांच्या मध्ये बेस्ट जोडी म्हणून समृद्धी सागर पाटील व आराध्या सागर पाटील यांनी बहुमान पटकावला.बेस्ट कोशूम विनर ह्या पूनम वेसणेकर यांना देण्यात आला.

नेहा काळे साक्षी काळे या विनर ठरल्या.बेस्ट परफॉर्मन्स म्हणून पहिल्या विजेत्या कुमोदिनी जाधव दुसऱ्या विजेत्या रेखा शिंदे व तिसऱ्या विजेत्या सिद्धी अगले यांनी बहुमान मिळवला.


या कार्यक्रमांमध्ये बेस्ट जोडी म्हणून पहिल्या विजेत्या स्नेहा व प्राची पाटील दुसऱ्या विजेत्या सपना व रंजना पवार त्याचबरोबर तिसरा क्रमांक ऋतुजा व रीना दभाडे या विजेत्या ठरल्या.बेस्ट गरबा क्वीन म्हणून जागृती जोशी विजेत्या ठरल्या.

त्याचबरोबर मेघा कुलकर्णी, स्नेहल गीता याही विजेत्या ठरल्या.एवर ग्रीन म्हणून दिव्या जोशी,चारुशीला पवार,कविता शहा यांनी मान पटकावला .या कार्यक्रमाचे सूत्र संचलन निवेदिका व अभिनेत्री सई जाधव यांनी केले.

या स्पर्धेचे परीक्षण कोरोग्राफर व मॉडेलमयुरी विशाल सुतार, मॉडेल आलिशा भानुषाली, कोरोग्राफर पुष्टी धावडा यांनी काम पाहिले.या स्पर्धेचा परीक्षकांनी अचूक व अंतिम निर्णय दिला.

विजेत्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गिफ्ट देऊन सत्कार करण्यात आला.हा कार्यक्रम खेळीमेळीत व आनंदात साजरा झाला.या कार्यक्रमामुळे महिलांना आपली कला सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ म्हणून SP-9 मराठी न्यूज चॅनल यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

या निर्भया रास गरबा दांडिया स्पर्धेमुळे महिलांच्या चेहऱ्यावर आनंद द्विगणित झाला होता.स्पर्धेत भाग घेतलेले त्याचबरोबर कार्यक्रमाला सहभागी झालेल्या महिला वर्गांनी एस पी नाईन मराठी माध्यम समूहावर शुभेच्छाचा वर्षाव केला.

या कार्यक्रमासाठी झंकार बिट्स विशाल सुतार व त्यांची टीम , मयुरी डान्स स्टुडिओ कोरोओग्राफर मॉडेल मयुरी सुतार यांनी मोलाचे सहकार्य केले. वेदांत क्रिएशन संध्या महाजन या गिफ्ट पार्टनर होत्या.

त्याचबरोबर जयश्री पाटील ह्या कार्यक्रमाच्या गिफ्ट पार्टनर होत्या.या कार्यक्रमावेळीया कार्यक्रमाया कार्यक्रमावेळी एसपी नाईन निर्भया वुमन असोसिएशन मॅनेजिंग डायरेक्टर प्राध्यापिका मेघा सागर पाटील, कार्यकारी संपादक विजय काळे, वृत्तसंपादक वैभव प्रधान, जाहिरात व्यवस्थापक श्रीकांत शिंगे, ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र मकोटे , व्हिडिओ एडिटर तोफिक जमादार,जाहिरात प्रतिनिधी शिवराज खोत, ग्राफिक्स डिझायनर सौरभ पाटील, निर्भयाच्या पदाधिकारी सुनिता हनिमुळे, रत्नागिरी संपादिका मेघा कोल्हटकर कुलकर्णी, प्रतिनिधी तेजस्विनी पाटील, एडमिन एक्झिक्यूटिव्ह प्रियांका शिर्के पाटील,निवेदिका स्नेहल घरपणकर, निवेदिका देवयानी गायकवाड, शाहूवाडी प्रतिनिधी अमर पाटील, पन्हाळा कॅमेरामॅन सरदार गायकवाड,युवराज वरुटे , सर्व एसपी नाईन मराठी न्यूज चॅनल टीम व महिला पुरुष वर्ग उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here