सह्याद्री अतिथीगृहातील बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार शरद पवार, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांसह मंत्री, विविध पक्षांचे निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.
यावेळी राज्यात शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मराठाआरक्षण बाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरिएटिव्ह याचिकेद्वारे राज्य शासनाची भूमिका भक्कमपणे मांडण्यासह सरकार प्राधान्याने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकडे लक्ष देत आहे.
जाती-जातींमध्ये सलोख्याची संस्कृती टिकवणे महत्त्वाचे आहे असे यावेळी बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले
न्यायालयीन प्रक्रियेद्वारे मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी सर्वतोपरी पावले उचलण्यात येतील.
तसेच राज्य मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून त्रुटी नसलेला परिपूर्ण डाटा विहित कालावधीत गोळा करण्यात येणार असल्याचे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर्वपक्षीय बैठकीत सांगितले.