राधानगरी /प्रतिनिधी, विजय बकरे
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून राधानगरी येथे काल संध्याकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला.
तसेच आज सकाळ पासून तहसीलदार कार्यालयाच्या आवारात सकल मराठा समाजाच्यावतीने व शहरवासीयांच्यावतीने साखळी उपोषणाला सुरुवात करण्यात आली.
राधानगरी येथील छ, शाहू महाराज व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून या साखळी उपोषनास सुरवात करण्यात आली, यावेळी सरपंच सविता भाटळे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही.
तोपर्यंत राधानगरी शहरात राजकीय पुढ्याऱ्यांना गावबंदीचा निर्णय घेण्यात आला, या संबंधीचे निवेदन तहसीलदार अनिता देशमुख यांना देण्यात आले, मनोज जरांगे-पाटील यांचे उपोषण सुरू आहे. तो पर्यत साखळी उपोषण सुरू राहणार अशी भूमिका सकल मराठा समाजाने घेतली आहे.