जिल्हापरिषदेच्या प्राथमिक शाळांचा सावळा गोंधळ नुकताच चव्हाट्यावर आला असून शासन दरबारी नेमकं चाललयं काय असा सवाल आता उपस्थित होवू लागला आहे. मात्र चाललेल्या कारभाराची रंगतदार चर्चा मात्र तालुक्यात सुरु झाली आहे.
पन्हाळा तालुक्यातील प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यांची रक्त गट तपासणी सुरु झाली आहे. तपासणी रक्त गटाची माहीती शासनाला देण्याची असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगितली जात आहे.
शाळा जिल्हा परिषदेच्या मात्र रक्त गट तपासणी करणारी यंत्रणा खाजगी लँबची तेही प्रत्येक विध्यार्थी मागे 30 ते 40 रुपये घेऊन. तालुक्यात हजारो विद्यार्थी प्राथमिक शाळेत शिक्षण घेत आहेत.
बोटावर मोजण्या इतक्याच शाळा मध्ये तपासणी काही लँब धारकांनी मोफत करून दिली आहे, मग शाळा जिल्हापरिषदेच्या सरकारी आरोग्य केंद्रही जिल्हा परिषदेचे मग विद्यार्थी रक्त गट तपासणी खाजगीमध्ये का….? याबाबत पन्हाळा तालुका गटशिक्षणाधिकारी मानकर यांच्यांशी संपर्क साधला असता, रक्त तपासणी बंधणकारक नाही.
तसेच जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये रक्त गट तपासणी करून घेतली तरी चालते असे सांगण्यात आले. पण याच आधिकाऱ्यांनी शिक्षिकांनी त्वरित रक्त गट तपासणी रिपोर्ट पाटवण्याचे आदेश दिले आहेत.
आरोग्य केंद्राकडे पुरेशे किट उपलब्ध नसल्याने रक्त गट तपासणी होत नसल्याचे समजते, तर जिल्हा मुख्यकार्यकारी अधिकारी सुभाष पाटील यांनी संबंधी प्रकरणाची चौकशी करू असे सांगितले आहे.
जर योजना शासनाची तर पालकांनी पैसे का खर्च करायचे. तसेच आरोग्य केंद्राकडे पुरेशी यंत्रणा नसेल तर त्यासाठी काहीतरी फंड शिक्षण विभागाकडे दिला असेलच याबाबत मात्र शंकांच आहे…..