दिवाळीच्या तोंडावर एसटीचा प्रवास महागला ; एसटी महामंडळाकडून तिकीट दरवाढ जाहीर

0
123

प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा

एसटी महामंडळाच्या राज्य परिवहन प्राधिकरणाने ऐन दिवाळीच्या तोंडावर प्रवाशांना झटका देणारा निर्णय घेतला आहे. एसटी महामंडळाने दिवाळीच्या गर्दी हंगामात १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे.

गावी जाणाऱ्या तसेच पर्यटनानिमित्त प्रवास करणाऱ्यांना प्रवाशांना या दरवाढीचा चांगलाच फटका बसणार आहे. एसटीकडून ही भाडेवाढ ७ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून म्हणजे ८ नोव्हेंबर ते २७ नोव्हेंबर दरम्यान लागू राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एसटीने दरवर्षी प्रमाणे महसूल वाढीच्या दृष्टीने परिवर्तनशील हंगामी तिकीट दरवाढ सूत्रानुसार केली आहे. एसटीच्या या निर्णयानुसार, या दिवाळीच्या हंगामात आपल्या सर्व बस प्रकारच्या तिकीट दरात वाढ करण्यात येणार आहे. सर्व प्रकारच्या सरकारी बसेस साठी तिकीट दरात सरसकट १० टक्के भाडेवाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here