विभागीय रिंग टेनिस स्पर्धेत मोहिते – पाटील विद्यालयास यश.

0
109

गोंदवले (जि. सातारा) येथे घेण्यात आलेल्या विभागीय रिंग टेनिस स्पर्धेत दत्ताजीराव मोहिते – पाटील माध्यमिक विद्यालय तिसंगी, ता. गगनबावडा शाळेच्या १९ व १७ वर्षाखालील मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक तर १७ वर्षाखालील मुलींच्या संघाने तृतीय क्रमांक पटकावला.

यामध्ये मुले १९ वर्षाखालील खेळाडू केदार पोतदार, प्रवीण कोलोलीकर, श्रीप्रसाद साळोखे, शिवराज पन्हाळकर, ऋतुराज खाडे तर १७ वर्षाखालील मुलांच्या संघांमध्ये प्रथमेश पाटील, शिवराज जाधव, विराज भिके, प्रेम चव्हाण तसेच १७ वर्षाखालील मुलींमध्ये दीक्षा पाटील, यशस्वी धनलोभे, संचिता पवार, सृष्टी कुंभार, स्वरा खाडे, ज्ञानेश्वरी खुटाले, अक्षता पाटील यांनी सहभाग घेतला.


खेळाडूंच्या वर महाविद्यालयातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
सर्व खेळाडूंना संस्था अध्यक्ष राजेंद्र मोहिते – पाटील, प्राचार्य व्ही. डी. पाटील, पर्यवेक्षक ए. बी. नाईक, संस्था सचिव महेंद्र मोहिते – पाटील, क्रीडा शिक्षक ए. डी. शिंदे, हिंदुराव सुतार, कालेलकर, खाडे यांचे मार्गदर्शन लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here