राधानगरी प्रतिनिधी -विजय बकरे
फराळे ता. राधानगरी येथील ओंकार शुगर अॅन्ड डिस्टीलरी पॉवर प्रा. लि. युनिट क्र. ३ हंगाम २०२३-२४ चा २ दुसरा बॉयलर अग्निप्रदिपन व गाळप हंगाम शुभारंभ मा.सौ.सुप्रियाताई जयंत पाटील (अध्यक्ष-, अलिबाग अर्बन सहकारी बँक हस्ते संपन्न झाला. यावेळी मा.चेअरमन बाबुराव बोत्रे पाटील ऊस दर एक रक्कमी ३१५०/- मे.टन जाहीर केला .
हंगाम २०२३ – २४ मध्ये कारखाना प्रशासनाकडून ४ लाख मे. टनाचे उदिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यासाठी आवश्यक असणारी ऊस तोडणी वाहतुक यंत्रणा सक्षमरीत्या भरुन अॅडव्हान्स वाटप करणेत आला आहे.
याप्रसंगी बोलत असताना कारखान्याचा वजनकाटा चोख असल्यामुळे ऊस उत्पादकांची फराळे कारखान्यास ऊसपुरवठा करणेची पसंती असते. ऊस दर हा शेजारील कारखान्यांच्या बरोबरीने देणेचा मानस कारखाना प्रशासनाचा आहे, त्यामुळे भागातील सर्व ऊस उत्पादकांनी आपल्या पिकवलेला सर्व ऊस कारखान्याकडे गळीतास पाठवून सहकार्य करावे असे आवाहन करणेत आले आहे. त्याचबरोबर ऊस बिल व तोडणी/ वाहतुक बिले वेळेवर अदा केली जातील असा विश्वास देणेत आला आहे.
कारखाना परिसरातील प्रामुख्याने सर्व स्थानिक वाहतुकदारांनी ऊस तोडणी वाहतुक करून कारखान्याचे उच्चांकी गाळप होणेसाठी आम्हास सहकार्य करावे असे आवाहन मा. श्री. पाटील यांनी यावेळी बोलतांना केले.
तसेच हंगाम २०२१-२२ मध्ये ऊस आलेल्या शेतक-यांना प्रती मे. टनास अर्ध्या किलो, साखर व हंगाम २०२२ – २३ मध्ये ऊस आलेल्या शेतक-यांना प्रती मे.टन १ किलो साखर तसेच कर्मचारी वर्ग यांना १० किलो साखर देणेत येईल असे पाटील यांनी सांगितले.
शेतकरी व वाहतुकदार यांनी मनोगत व्यक्त केली. तसेच कारखान्याचे संचालीका रेखाताई बोत्रेपाटील यांनी मार्गदर्शन केले.यावेळी कारखान्याचे जनरल मॅनेजर शत्रुघ्न पाटील, टेक. जनरल मॅनेजर आर आर देसाई मुख्य शेतीअधिकारी समीर व्हरकट, चिफ अकौन्ट शरद पाटील चीफ केमिस्ट बरगे भागातील शेतकरी सर्व ऊस तोडणी/ वाहतुक कंत्राटदार सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.