राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. तालुकाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते एम. जे.पाटील यांच्या मातोश्री श्रीमती रुक्मिणी जोतीबा पाटील यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्या १०५ वर्षाच्या होत्या.
मनमिळाऊ आणि कुटुंबातील कर्त्या म्हणून त्या पंचक्रोशीमध्ये नावारूपास आल्या होत्या. आपला स्वभाव आणि आपुलकीपण यांच्या माध्यमातून त्यांनी माणूसपण जोडलं होतं. त्यांच्या पश्चात मुले, सुना, नातवंडे, मुली, पनतवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने कालकुंद्री परिसरात शोक व्यक्त करण्यात येतोय.