कोकरूड नजीक भीषण अपघात, भरधाव ट्रॅव्हल्स वारणा नदीत कोसळली

0
353

प्रतिनिधी :अभिनंदन पुरीबुवा


कोल्हापूर: कोल्हापूर जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात कोकरूड नजीक भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. गोव्या मधून प्रवाशांना घेऊन मुंबईच्या दिशेने येणारी ट्रॅव्हल्स शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावरून वारणा नदीपात्रात कोसळली.

सुदैवाने या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही. भीषण अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांन सह घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत बचावकार्य केले.ट्रॅव्हल्समधील सर्व प्रवाशांना दुसऱ्या वाहनातून पाठवण्यात आलं आहे.

ट्रॅव्हल्सवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याची प्राथामिक माहिती मिळाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघातग्रस्त ट्रॅव्हल्स १५ ते २० प्रवाशांना घेऊन गोव्याहून मुंबईच्या दिशेने


कोल्हापूर जिल्ह्यातील तुरकवाडी आणि सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील कोकरूड पुलावर आली असता, आज ९ नोव्हेंबर रोजी पहाटे सहा वाजण्याच्या सुमारास चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि ट्रॅव्हल्स थेट वारणा नदीपात्रात कोसळली. सुदैवाने या अपघातात प्रवाशांना कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here