प्रतिनिधी: अभिनंदन पुरीबुवा
मालवण तालुक्यातील तारकर्ली येथील समुद्रात चौघे पर्यटक बुडाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी ४ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील कागल तालुक्यातील मुरगुड येथील एका सायबर कॅफेच्या २० विद्यार्थ्याची सहल तारकर्ली येथे आली होती.
समुद्रात आंघोळीला गेले असता अंदाज न आल्याने ४ युवक बुडाले.यातील तिघांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले असून एकाचा शोध सुरू आहे.
एमटीडीसी समोरील समुद्रात बुडून एक पर्यटक बेपत्ता झाल्याची घटना १० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वाजण्याच्या दरम्यान घडली. आदित्य पाटील (वय-२१) रा. बस्तवडे, ता. कागल जि. कोल्हापूर असे बेपत्ता पर्यटकाचे नाव आहे.