लोकराज्य जनता पार्टीच्या कोडोली शाखेचे उत्साहात उद्घाटन.
कोडोली लोकराज्य जनता पार्टीच्या कोडोली ता. पन्हाळा येथील शाखा बोर्डाचे उद्घाटन लोकराज्यचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण यांच्या हस्ते दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आले.
यावेळी लोकराज्य जनता पार्टीचे कोडोली शहराध्यक्ष संजय शिंदे ,हातकणंगले लोकसभा अध्यक्ष डॉ. दिलीप शेटे, शाहूवाडी तालुका कार्याध्यक्ष धनाजी गुरव,सामाजिक कार्यकर्ते रमेश मेनकर, सुखदेव पाटील संदीप माने, सावकर चव्हाण,दशरथ सुतार, हातकणंगले तालुका संघटक प्रमोद जाधव, विशाल लोहार, लालासाहेब लोहार आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना लोकराज्यचे संस्थापक अध्यक्ष अनिल चव्हाण म्हणाले, प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सर्वसामान्य माणसाचे प्रश्न समजून घेऊन त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केले पाहिजे.
वाढती महागाई, बेरोजगारी हे समाजासमोर भेडसावणारे मोठे प्रश्न आहेत.
यासाठी जनजागृती करण्याचे कार्य लोकराज्य जनता पार्टी भविष्यात करेल, असे विचार अनिल चव्हाण यांनी मांडले.
उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक शहराध्यक्ष संजय शिंदे यांनी केले.
आभार धनाजी गुरव यांनी मानले. हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात संपन्न झाला.