श्री शिव समर्थ जनरल स्टोअर्स कडून दिवाळी निमित्त ग्राहकांना अनोखी भेट.

0
68

श्री शिव समर्थ जनरल स्टोअर्स कडून दिवाळी निमित्त ग्राहकांना अनोखी भेट.

दिवाळी मध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या भेटवस्तू, ऑफर्स, सेल लागलेले आपण कित्येकदा पाहिले असतील, परंतु गगनबावडा तालुक्यातील एका दुकानदाराने आपल्या ग्राहकांना दिवाळीनिमित्त अनोखी भेट दिली.

तालुक्यात निवडे – साळवण बाजारपेठ ही मुख्य बाजारपेठ समजली जाते. निवडे येथील श्री शिव समर्थ जनरल स्टोअर्स चे प्रोप्रायटर संजय लोखंडे यांनी आपल्या ग्राहकांना दिवाळीनिमित्त एक अनोखी भेट सुपूर्द केली.

या कार्यक्रमाचे उद्घाटन वृक्षाला पाणी घालून करण्यात आले. निसर्गाचा समतोल राखला जावा, पशुपक्ष्यांना निवारा मिळावा. हा उदात्त हेतू डोळ्यांसमोर ठेवून भेटवस्तू म्हणून त्यांनी ग्राहकांना गगनबावडा वनक्षेत्रपाल प्रियांका भवर यांच्या शुभहस्ते वृक्षाच्या रोपांचे वाटप केले.

ग्राहकांनी या उपक्रमाचे मोठ्या आनंदाने स्वागत केले. यावेळी गगनबावडा वनक्षेत्रपाल प्रियांका भवर यांनी देखील या उपक्रमाचे कौतुक केले.

संजय लोखंडे हे आपल्या कुटुंबा सोबत गेली तीन वर्षापासून निवडे येथे आपला किराणा व्यवसाय सांभाळतात. त्यांना पशुपक्षी व निसर्ग याबद्दल आकर्षण आहे. निसर्गाचे संवर्धन व्हावे हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम केल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी छाया लोखंडे, भगवान माळवी , उपसरपंच अक्षता देशमाने, पोलीस पाटील गीता बागडी, सामाजिक कार्यकर्ते दीपक पाटील, शिवाजी राऊत, वनपाल संभाजी चरापले, वनरक्षक नितीन शिंदे, शौकत महात आदि उपस्थित होते.
Sp 9 साठी गगनबावडा हून उत्तम पाटील

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here