कागल प्रतिनिधी : प्रदिप अवघडे
मुरगूड :(ता.कागल ) :दिवाळी म्हटलं की कंदील, फटाके, फराळ अशा सर्व गोष्टींप्रमाणेच दिवाळीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे रंगोळी व किल्ले. जसे फराळ, फटाके, पणत्या, आकाशकंदील डोळय़ांपुढे येतात, तसेच बाल अंगणातील किल्लाही आठवतो.
पण, दिवाळीच्या सुट्टीत घराच्या आवारात महाराष्ट्रातील विविध किल्ल्यांची प्रतिकृती उभारण्याच्या जुन्या परंपरेकडे सध्याच्या ‘स्मार्टफोन’ युगात ओढ कमी झाली आहे. लहानांच्या विश्वातला आणि मोठय़ांच्या आठवणीतला असा हा दिवाळीचा किल्ला!
माहिती तंत्रज्ञान बातम्या व sp-9 न्युज चॅनल आयोजित दिवाळी निमित्त कागल तालुक्यातील चिमगांव मर्यादित रांगोळी व गड किल्ले स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा भावेश्वरी मंदिर येथे दिनांक १५ नोव्हबर २०२३ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
महिलाच्या व बच्चेकंपनीच्या कला गुणांना वाव मिळावा. त्यांचे कला कौशल्य जनतेसमोर यावे व भारतीय संस्कृती टिकून राहावी या दृष्टीकोनातून माहिती तंत्रज्ञान बातम्या व sp-9 न्युज आयोजित रांगोळी व गडकिल्ले स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले होते.
रांगोळी स्पर्धेत महिला प्रथम क्रमांक – स्मिता स्वप्निल चौगले( चिमगाव), द्वितीय – सुशिला सदाशिव मांगले ( चिमगांव), तृतीय-प्राजक्ता दतात्रय (चिमगांव )
तसेच गड किल्ले स्पर्धेत प्रथम क्रमांक – विराज संदीप चौगले (चिमगांव),द्वितीय – क्षेयश तानाजी गुरव (चिमगांव), तृतीय -सार्थक सागर
भोई (चिमगाव),
या स्पर्धकांनी ठसा उमटवला सर्व सहभागी स्पर्धकांना सन्मान चिन्ह, सहभागपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.व्यासपीठावर
प्रमुख पाहुणे म्हणून दिपक आंगज(सरपंच चिमगाव) सागर सदाशिव भोई (ग्रा.प.सदस्य ),मा.प्रमोद पुरीबुवा(बुवा कंट्रक्शन)मा लक्ष्मण फराकटे (सामाजिक कार्यकर्त)एकनाथ एकल (महाराज )उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे सुत्र संचालन व आभार प्रदर्शन संजय मुसळे सर यांनी केले.
सदर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी माहिती तंत्रज्ञान बातम्या चे सुरेश भोई (माहिती तंत्रज्ञान बातम्या दिव्यांग जिल्हा अध्यक्ष)व sp-9 मराठी न्युज चॅनल चे प्रतिनिधी अभिनंदन पुरीबुवा व प्रदिप अवघडे आदींनी विशेष मेहनत घेतली.