माध्यमे हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, ज्यामुळे लोकशाहीला बळ मिळते; असे आपण सगळे मानतो. याबरोबरच आपल्या प्रत्येकाची विवेकबुद्धी ही या लोकशाहीला बळ देण्यासाठी आणि तिने या देशातील सगळ्यात शेवटच्या माणसासाठी काही उच्चार करण्याचे धैर्य दाखवावे ही अपेक्षा आहे!
देशातील लोकशाही संकुचित करणाऱ्या महाशक्ती समोर गंगारती करणाऱ्या माध्यमकर्मिंची संख्या झपाट्याने वाढत असताना आज असा संकल्प करण्याची गरज आहे आणि आपल्या सर्वांचे ते कर्तव्यही आहे, असे मला नम्रपणे वाटते.
पुन्हा एकदा आपणा सर्वांना राष्ट्रीय पत्रकार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!